जिल्हा सेतू समिती, नांदेड - आधार संच अर्ज सूचना

आधार संच मिळण्यासाठी अर्ज करण्याच्या सूचना

जिल्हा सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड

आधार संच मिळण्यासाठी आवेदन पत्रासोबत आपले सरकार सेवा केंद्र चालकांचे अनिवार्य कागदपत्र

  1. आधार संच मिळण्यासाठी फक्त जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या आपले सरकार सेवा चालकांनीच अर्ज करावे. इतर अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  2. आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी 24.06.2025 ते 04.07.2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावे.
  3. सदर कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
  4. अर्जामध्ये सर्व माहिती परिपूर्ण भरावी आणि आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावी.
  5. 12वी उत्तीर्ण गुणपत्रक
  6. आपले सरकार सेवा केंद्र आयडी
  7. आधार कार्ड
  8. पॅन कार्ड
  9. बँक पासबुक ची झेरॉक्स
  10. अर्जदारांनी अर्ज शुल्क रक्कम रू. 500/- E-SUVIDHA COLLECTORATE NANDED Gurudwar Branch Nanded A/c No. 52073059077 IFSC Code SBIN0021097 या खात्यामध्ये जमा करून जमा केल्याची पावती ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करावी.
आधार संच मिळण्याकरीता अटी व शर्ती:
    1. एक अर्जदार केवळ एका जागेसाठी अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याचे सर्व अर्ज बाद करण्यात येतील.
    2. अर्जदार ज्या मंडळामध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालवत आहेत, त्याच महसूल मंडळात आधार केंद्रासाठी अर्ज करू शकतात. मंडळाबाहेरील अर्ज बाद करण्यात येतील.
    3. आधार संचासाठी/किटसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे DIT किंवा कोणत्याही अन्य नोंदणीकृत संस्थेकडून वितरित करण्यात आलेले दुसरा कोणताही आधार संच नसावा. जर एकापेक्षा जास्त आधार संच आढळल्यास, जिल्हा प्रशासन अतिरिक्त संच जप्त करून अन्य पात्र उमेदवाराला वितरित करेल.
    4. सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, किंवा संच मिळाल्यानंतर एका महिन्यात परीक्षा उत्तीर्ण करून प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
    5. UIDAI च्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
    6. आधार संच मंजूर झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
    7. ८ दिवसाच्या आत ₹25000/- चा DD "E-SUVIDHA COLLECTORATS NANDED" नावे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच संच हस्तांतरित होईल.
    8. ३० दिवसाच्या आत ₹50000/- ची Performance Bank Guarantee जमा करणे बंधनकारक राहील.
    9. आधार केंद्र नेमून दिलेल्या शासकीय ठिकाणीच कार्यरत असणे आवश्यक आहे.
    10. नाहरकत प्रमाणपत्र (NOC) संबंधित कार्यालयाकडून घेणे आवश्यक राहील.
    11. सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:०० या वेळेत सेवा सुरू ठेवणे बंधनकारक राहील (शासकीय सुट्ट्या वगळता).
    12. केंद्र दुसऱ्या नावावर हस्तांतरित करता येणार नाही किंवा पत्ता बदलता येणार नाही.
    13. Audio-enabled CCTV कैमेरा बसवणे बंधनकारक आहे.
    14. Digital Payment चा वापर करणे बंधनकारक आहे.
    15. रेट चार्ट, आवश्यक कागदपत्रांची यादी आणि 1947 हेल्प डेस्क क्रमांक लावणे बंधनकारक आहे.
    16. नोंदणी रजिस्टर व्यवस्थित ठेवणे बंधनकारक आहे.
    17. शासकीय लाभासाठी लाभार्थ्यांचे नियमित कॅप करणे आवश्यक आहे.
    18. केंद्राबाबत तक्रार आल्यास शहानिशा करून केंद्र रद्द होऊ शकते व अनामत रक्कम जप्त केली जाऊ शकते.
    19. कोणता अर्ज स्वीकारायचा हे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आधार नियंत्रण समिती, नांदेड यांच्याकडे अखत्यारित आहे.
आधार संच मिळण्याकरीता निकष:
  1. महसूल मंडळामधील आपले सरकार सेवा केंद्र चालकांना आधार संच मंजूरी दिले जाईल.
  2. तथापि आपले सरकार सेवा केंद्राच्या व्यवहाराच्या संख्येमध्ये समानता आढळल्यास सोडत पद्धतीने (Lucky Draw) आधार नोंदणी संच मंजूर करण्यात येईल.
  3. अ.क्र. 1 व 2 मधील निकषानुसार अर्ज प्राप्त न झाल्यास लगतच्या महसूल मंडळातील केंद्रचालकांचा विचार करण्यात येईल.

Taluka Information

Sr.No Taluka Nos. (Mandal Count)
1 नांदेड 6
2 अर्धापुर 1
3 कंधार 6
4 लोहा 3
5 भोकर 4
6 मुदखेड 1
7 हदगाव 3
8 हि.नगर 2
9 किनवट 7
10 माहूर 3
11 देगलूर 5
12 मुखेड 5
13 बिलोली 4
14 नायगाव खै 4
15 धर्माबाद 2
16 उमरी 3

वापरकर्ता लॉगिन

© 2025 DM Backoffice, Collector Office Nanded. All rights reserved .